भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां आठवूं पाउलें

atan athavun paulen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आतां आठवूं पाउलें । सकुमार चांगले इटे ते ॥१॥ तेणें प्रसन्न्‍ होती गुरु । संत मुनिश्वरु करुणाब्धी ॥२॥ आदर त्यांचा ईटेवरी । तो मज निर्धारीं जाणवला ॥३॥ निळा म्हणे जिवीं ते ध्यातां । कृत्यकृत्यता करितील ॥४॥