भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां अभक्त कातर । मळिन जयाचें अंतर

atan abhakta katar | malin jayachen antar

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आतां अभक्त कातर । मळिन जयाचें अंतर ॥१॥ दाऊनियां वरदळ वेष । मना अंगी आशापाश ॥२॥ वाचे सात्विक बोलणें । विषयीं वासनेचें ठाणें ॥३॥ निळा म्हणे घेउनी सोंगें । निरवे चार करीत उगे ॥४॥