भजनी मालिका
← भजनांकडे परत

अस्थिमांसाचा हा कोथला । ऐसा देह अमंगळा

asthimansacha ha kothala | aisa deh amangala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अस्थिमांसाचा हा कोथला । ऐसा देह अमंगळा ॥१॥ प्राणी म्हणती माझें माझें । खर जैसे वाहे वोझें ॥२॥ न कंटाळे कधीं मन । जेवीं भुलें सर्प जाण ॥३॥ एका जनार्दनीं देवा । याचा विसर पाडावा ॥४॥