भजनी मालिका
← भजनांकडे परत

असोनी उत्तम न करी भजन । संतसेवा दान धर्म नेणें

asoni uttam na kari bhajan | santaseva dan dharma nenen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
असोनी उत्तम न करी भजन । संतसेवा दान धर्म नेणें ॥१॥ काय त्यांचे कुळ चांडाळ चांडाळ । मानी तो विटाळ यमधर्म ॥२॥ सदा सर्वकाळ्फ़ संतांची करी निंदा । पापांची आपदा भोगी नरक ॥३॥ स्वमुखें आपण सांगे जनार्दन । एका जनार्दन पूजन करी सुखें ॥४॥