भजनी मालिका
← भजनांकडे परत

असोनि उत्तम कुळीं । नाम नाहीं ज्याचे कुळीं

asoni uttam kulin | nam nahin jyache kulin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
असोनि उत्तम कुळीं । नाम नाहीं ज्याचे कुळीं ॥१॥ जन्मोनी अधम कुळीं । सदा जपे नामावळी ॥२॥ कुळासी तो नाहीं काज । नाम वदतांचि निज ॥३॥ नाम पावन हे जनीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥