भजनी मालिका
← भजनांकडे परत

अष्टांग योग साधिती साधनी । तो हारिकीर्तनीं नाचे बापा

ashtang yog sadhiti sadhani | to harikirtanin nache bapa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अष्टांग योग साधिती साधनी । तो हारिकीर्तनीं नाचे बापा ॥१॥ यज्ञादिकीं अवदान नेघें वो माये । तो उभा राहुनी क्षीरापती खाये ॥२॥ पवन कोंडोनि योगी जाती निराकारीं । तो हरि धर्माघरीं पाणी वाहे ॥३॥ सनकनंदन जया ध्याताती आवडी । तो अर्जुनाची घोडीं धुतो हरि ॥४॥ एका जनार्दनीं भक्तांच्या अंकित । म्हणोनि तिष्ठत विटेवरी ॥५॥