भजनी मालिका
← भजनांकडे परत

अष्टदिशी व्यापक नारायण । तेथें नाहीं पूर्व पश्चिमेंचें भान

ashtadishi vyapak narayan | tethen nahin purva pashchimenchen bhan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अष्टदिशी व्यापक नारायण । तेथें नाहीं पूर्व पश्चिमेंचें भान ॥१॥ पहा कर्माची राहाटी । सर्व व्यापक संकल्प म्हणती उठाउठी ॥२॥ नको विष्णु म्हणतां भेद उरला नाहीं । भेदभावें पाहाती सर्वाठायीं ॥३॥ भेदाभेद टाकुनी देई वेगें । एका जनार्दनीं शरण रिघे ॥४॥