भजनी मालिका
← भजनांकडे परत

अशाश्वतासाठीं । कां रें देवासवें तुटीं

ashashvatasathin | kan ren devasaven tutin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अशाश्वतासाठीं । कां रें देवासवें तुटीं ॥१॥ अंतकाळींचें बंधन । कोण निवारी पतन ॥२॥ तूं म्हणसी हें माझें । खरा ऐसें वाहसी वोझें ॥३॥ पावलिया अवसानीं । कोणी नाहीं बा निर्वाणीं ॥४॥ याचा न धरी विश्वास । एका जनार्दनाचा दास ॥५॥