भजनी मालिका
← भजनांकडे परत

आशापाश सोडोनि देई । संतासीं तूं शरण जाईं । चौर्‍याशींचें भय नाहीं । प्राणिया तुज

ashapash sodoni dei | santasin tun sharan jain | chaur‍yashinchen bhay nahin | praniya tuj

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आशापाश सोडोनि देई । संतासीं तूं शरण जाईं । चौर्‍याशींचें भय नाहीं । प्राणिया तुज ॥१॥ आवडी धरीं संतसंग । कामक्रोधा होय भंग । षडवैरीयां मार्ग । मोकळाची ॥२॥ संतसंग धरतां चित्तीं । उपाधी ते सर्व तुटती । भावें होय मोक्षप्राप्ती । क्षणमात्रें ॥३॥ नाहीं आणीक साधन । संतसंगतीवांचून । शरण एका जनार्दन । संतसंग धरीं ॥४॥