भजनी मालिका
← भजनांकडे परत

आशाबद्ध करिती देवाचें पूजन । तेणें नारायण तुष्ट नोहे

ashabaddha kariti devachen pujan | tenen narayan tushta nohe

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आशाबद्ध करिती देवाचें पूजन । तेणें नारायण तुष्ट नोहे ॥१॥ आशाबद्ध करिती वेदाचें पठन । तेणें नारायण तुष्ट नोहे ॥२॥ आशाबद्ध करिती श्रवण । तेणें नारायण तुष्ट नोहे ॥३॥ आशाबद्ध करिती दैवत उपासन । तेणें नारायण तुष्ट नोहे ॥४॥ आशाबद्ध करिती जपतप हवन । तेणें नारायण तुष्ट नोहे ॥५॥