भजनी मालिका
← भजनांकडे परत

असत्य जन्मलें असत्याचें पोटीं । अर्थबळें चावटीं शिकविती

asatya janmalen asatyachen potin | arthabalen chavatin shikaviti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
असत्य जन्मलें असत्याचें पोटीं । अर्थबळें चावटीं शिकविती ॥१॥ अर्थीं धरूनी आस असत्य बोलणें । अर्थासाठीं घेणें मंत्रयंत्र ॥२॥ अर्थासाठीं प्राण त्यजिती जनीं । अर्थें होत हानी प्राणिमात्रा ॥३॥ एका जनार्दनीं अर्थाचा संबंध । तेथें भेदाभेद सहज उठे ॥४॥