भजनी मालिका
← भजनांकडे परत

असतें उत्तम सुकृत जरी गांठी । तरी कां ऐसी आटी पडती देवा

asaten uttam sukrut jari ganthi | tari kan aisi ati padati deva

रचनाकार: संत निळोबा · अभंग
असतें उत्तम सुकृत जरी गांठी । तरी कां ऐसी आटी पडती देवा ॥१॥ लाजोनियां आजि पळतसा माघारे । ऐकोनी उत्तरें करुणेचीं हीं ॥२॥ नये कांही मना सेवा माझी भक्ति । तरिच धरिलें चित्तीं उदासीन ॥३॥ निळा म्हणे माझा पुरता आला वीट । देखोनी आदटकर्म बळी ॥४॥