भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुल्या पित्यासी तिणें बोलाविलें । जाहलें तें कथिलें वर्तमान

apulya pityasi tinen bolavilen | jahalen ten kathilen vartaman

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आपुल्या पित्यासी तिणें बोलाविलें । जाहलें तें कथिलें वर्तमान ॥१॥ पतीचा संकल्प नोहे अंगसंग । राहिला उद्योग प्रपंचाचा ॥२॥ महाजन शेटे सर्व मेळविले । विचारी बैसले कुल्लाळ सर्व ॥३॥ धाकुटी ती मूल आपण पैं द्यावी । संतती चालवावी गोरोबाची ॥४॥ एका जनार्दनीं करुनी विचार । विवाह प्रकार केला दुजा ॥५॥