भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुलिया हिता आपण जागिजे । वायां न नागविजे देही देहा

apuliya hita apan jagije | vayan na nagavije dehi deha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आपुलिया हिता आपण जागिजे । वायां न नागविजे देही देहा ॥१॥ हाचि अनुताप घेऊनियां मना । करी पां चिंतना रामनाम ॥२॥ नाहीं कांहीं मोल सुलभ फुकाचें । घेई सदा वाचे रामनामक ॥३॥ एका जनार्दनीं किती हें सांगावें । गुंतलें ते हावे नायकती ॥४॥