भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुलिया घरा जाती मुकवत । नाहीं दुजा हेत चित्तीं कांहीं

apuliya ghara jati mukavat | nahin duja het chittin kanhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आपुलिया घरा जाती मुकवत । नाहीं दुजा हेत चित्तीं कांहीं ॥१॥ परस्परें बोल बोलती अबळा । कैशीं नवल कळा देखियली ॥२॥ धरुनिया करीं जाती तेथवरी । उभा असे हरी जवळींच ॥३॥ एका जनार्दनीं न कळें लाघव । तटस्थ गोपी सर्व मनामाजीं ॥४॥