भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुले पारखे सांगतां नायकती । करितसे खंती संसाराची

apule parakhe sangatan nayakati | karitase khanti sansarachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आपुले पारखे सांगतां नायकती । करितसे खंती संसाराची ॥१॥ काय संसाराचें सुख तें तयासी । कोण फांसा चुकवील ॥२॥ कधीं रामनाम नाठवी पामर । भोगिती अघोर जन्म कोटी ॥३॥ एका जनार्दनीं एकपणें शरण । जनीं जनार्दनीं आम्हां आहे ॥४॥