भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुला न टाकीं पां आचार । उपजले कुळींचा वेव्हार । स्वधर्म तो सार । पाळीं पाळीं बापा

apula na takin pan achar | upajale kulincha vevhar | svadharma to sar | palin palin bapa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आपुला न टाकीं पां आचार । उपजले कुळींचा वेव्हार । स्वधर्म तो सार । पाळीं पाळीं बापा ॥१॥ त्यातें म्हणणें संसार । येर बोलणें असार । निष्ठावंत जे नर । देवाचि समान ॥२॥ अथीतासी द्यावें अन्न । गोब्राह्मणांचें पूजन । मुखीं नामस्मरण । तोचि एक संसारीं ॥३॥ सांडोनियां गृह दारा । धांव घेतली डोंगरा । अंतरीं भरला सारा । विषयीक भाव ॥४॥ बकाचे परि ध्यान । नको नको अनुष्ठान । एका जनार्दनीं मन । स्थिर करीं सर्वदा ॥५॥