भजनी मालिका
← भजनांकडे परत

अपाय उपाय न टाकी कीर्तन । सदा सर्वकाळ ध्यान रामकृष्ण

apay upay na taki kirtan | sada sarvakal dhyan ramakrushna

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अपाय उपाय न टाकी कीर्तन । सदा सर्वकाळ ध्यान रामकृष्ण ॥१॥ तयाचिये घरीं वसे नारायण । लक्ष्मी सह आपण कार्य करी ॥२॥ एका जनार्दनीं कीर्तनासाठीं । देव धांवें पाठीं त्या मागें ॥३॥