भजनी मालिका
← भजनांकडे परत

अपार संत झाले क्षितीं । ऐकिलें ऐकाल पुढेंही होती

apar sant jhale kshitin | aikilen aikal pudhenhi hoti

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अपार संत झाले क्षितीं । ऐकिलें ऐकाल पुढेंही होती ॥१॥ जे जे झाले हरिचे दास । करितां कीर्तनें सांडुनी आस ॥२॥ दर्शनें मुक्ति आणिकां देती । उदंड पावन केल्या याती ॥३॥ निळा म्हणे सनकादिक । आदि करुनि अनामिक ॥४॥