भजनी मालिका
← भजनांकडे परत

अपार महिमा संतांचा । काय बोलुं मी वाचा

apar mahima santancha | kay bolun mi vacha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अपार महिमा संतांचा । काय बोलुं मी वाचा ॥१॥ मागें तरले पुढें तरती । जदजीवा उद्धरती ॥२॥ नाममात्रा रसायन । देउनी तारिती संतजन ॥३॥ ऐशा संतां शरण जाऊं । एका जनार्दनीं ध्याऊं ॥४॥