भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपपर ते नोळखती । अवघाचि देखती विठ्ठल

apapar te nolakhati | avaghachi dekhati viththal

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आपपर ते नोळखती । अवघाचि देखती विठ्ठल ॥१॥ पूर्ण होऊनि ठेलें काम । आत्माराम देह त्यांचा ॥२॥ विठ्ठल कानीं विठ्ठल घ्राणीं । विठ्ठल नयनीं मनामाजी ॥३॥ निळा म्हणे विठ्ठल अंगे । रंगले रंगे विठठलाच्या ॥४॥