भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपणचि ते येती घरा । देखोनि बरा निजभाव

apanachi te yeti ghara | dekhoni bara nijabhav

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आपणचि ते येती घरा । देखोनि बरा निजभाव ॥१॥ आप्तपणें आलिंगिती । मनींचा पुरविती हेत सकळ ॥२॥ अनाथ अनन्य देखोनी रंक । करिती कौतुक खेळविती ॥३॥ निळा म्हणे लाविती सेवे । आपुलिया वैभवें गौरविती ॥४॥