भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंतरीं भरला दृढ काम । वरीवरी दावीतसे नेम

antarin bharala drudh kam | varivari davitase nem

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अंतरीं भरला दृढ काम । वरीवरी दावीतसे नेम ॥१॥ जैसें फळ वृंदावन । परी अंतरीं कडुं पूर्ण ॥२॥ सदा वाहे तळमळ चित्त । वरीवरी दावी परमार्थ ॥३॥ एका शरण जनार्दनीं । ऐसे नर पापखाणी ॥४॥