भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणिकातेंही विठ्ठल करिती । लागले संगती भाविक त्या

anikatenhi viththal kariti | lagale sangati bhavik tya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आणिकातेंही विठ्ठल करिती । लागले संगती भाविक त्या ॥१॥ यांचा वारा लागेल ज्यासी । येती त्यासी मुक्तीही वरुं ॥२॥ घडतां त्यांचें अवलोकन । होती पावन महा पापी ॥३॥ निळा म्हणे त्यांची भेटी । तेचि गांठी विठठलेचि ॥४॥