भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणिकांते उपदेशी । आपण मळिन मानसीं

anikante upadeshi | apan malin manasin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आणिकांते उपदेशी । आपण मळिन मानसीं ॥१॥ बोले ते ते धूर्त वादें द लटिक्याचि प्रेमें रडे स्फुंदे ॥२॥ सोंग परमार्थ हा सार । आशा अंतरी विखार ॥३॥ निळा म्हणे देहाभिमानें । गेलीं भोगिती ते पतनें ॥४॥