भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणिकांसी सांगे आशेचें बंधन । सदाचा बराडी असोनी आपण

anikansi sange ashechen bandhan | sadacha baradi asoni apan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आणिकांसी सांगे आशेचें बंधन । सदाचा बराडी असोनी आपण ॥१॥ काय म्हणावें यावरि आतां । नष्टाचा परम नष्ट हाचि हा पहातां ॥२॥ भक्ताच्या हाताची पाहातसे वास । कांही देतील म्हणउनी टोकतचि बैसे ॥३॥ जळ फळ पुष्प्‍ देतां कांहींचि न सोडी । देऊं जातांचि घाली हा तोंडीं ॥४॥ आशेचा बांधला देव हा कैसा । कायं निवारील आमुची आशा ॥५॥ भक्त्‍ नदिती तैं उपवासीचि बैसे । काय खाईल जवळी कांहींचि या नसे ॥६॥ निळा म्हणे हा अनाथ बापुडा । जाणती संत परि न बोलती भीडा ॥७॥