भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणिकांचे धरितां आस । होतो नाश जीवित्वा

anikanche dharitan as | hoto nash jivitva

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आणिकांचे धरितां आस । होतो नाश जीवित्वा ॥१॥ म्हणोनि निर्धारिलें मन । धरिलें ठाणें रामकृष्ण ॥२॥ न धांवे आतां कोठें मन । हृदयीं ध्यान धरिलें तें ॥३॥ एका जनार्दनीं प्राण । ठेविला जाण समूळ चरणीं ॥४॥