भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणिकाचें मतें सायास न करणें । आम्हांसी पाहुणे पंढरीराव

anikachen maten sayas na karanen | amhansi pahune pandharirav

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आणिकाचें मतें सायास न करणें । आम्हांसी पाहुणे पंढरीराव ॥१॥ डोळां भरुनिया पाहिलें देवासी । तेणें चौर्‍यायंशी चुकली सत्य ॥२॥ एका जनार्दनी देवाधिदेव । देखिला स्वयमेव विटेवरी ॥३॥