भजनी मालिका
← भजनांकडे परत

आनंदे वैष्णव गाती पै नाचती । जयजयकार करिती ऋषीमुनी

anande vaishnav gati pai nachati | jayajayakar kariti rushimuni

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आनंदे वैष्णव गाती पै नाचती । जयजयकार करिती ऋषीमुनी ॥१॥ विमानांची दाटी पुष्पांचा वरुषाव । स्वर्गीहूनि देव करिताती ॥२॥ स्वयें परब्रम्ह करीत सोहळा । सकळ भक्तमेळा प्रतिष्ठान ॥३॥ निळा म्हणे हरि निघाले पंढरी । आनंद भीतरीं ब्रम्हादिकां ॥४॥