भजनी मालिका
← भजनांकडे परत

आनंद अद्वय नित्य निरामय । सावळा भासताहे मजलागीं

anand advay nitya niramay | savala bhasatahe majalagin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आनंद अद्वय नित्य निरामय । सावळा भासताहे मजलागीं ॥१॥ वेधु तयाचा माझिया जीवा । काया वाचा मनोभावा लागलासे ॥२॥ वेधलें मन झालें उन्मन । देखतां चरण गोड वाटे ॥३॥ पाहतां पावतां पारुषला जीव । एका जनार्दनीं देव कळों आला ॥४॥