भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुचें कुळींचे दैवत । श्रीगुरुदत्तराज समर्थ

amuchen kulinche daivat | shrigurudattaraj samartha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आमुचें कुळींचे दैवत । श्रीगुरुदत्तराज समर्थ ॥१॥ तोचि आमुचा मायबाप । नाशी सकळ संताप ॥२॥ हेंचि आमुचें व्रत तप । मुखी दत्तनाम जप ॥३॥ तयाविण हे सुटिका । नाहीं नाहीं आम्हां देखा ॥४॥ एका शरण जनार्दनीं । दत्त वसे तनमनीं ॥५॥