भजनी मालिका
← भजनांकडे परत

अमृत तें स्वर्गी निर्जर सेविती । परि चरफडती नामामृत

amrut ten svargi nirjar seviti | pari charaphadati namamrut

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अमृत तें स्वर्गी निर्जर सेविती । परि चरफडती नामामृत ॥१॥ धन्य ते दैवाचे नाम घेती वाचे । होतें पैं जन्माचें सार्थक तेणें ॥२॥ न लगे उपवासकरणे अष्टांग । न लगे नानायोग साधनें तीं ॥३॥ एका जनार्दनीं नामामृत सार । उतरले पैलपार वैष्णव जन ॥४॥