भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमोद न सोडी कर्पुर । किंवा प्रभेतें रविकर

amod na sodi karpur | kinva prabheten ravikar

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आमोद न सोडी कर्पुर । किंवा प्रभेतें रविकर ॥१॥ तैसेचि देव आणि भक्त । येरयेरीं विराजित ॥२॥ जेंवि साखरेतें गोडी । चंदन सौरभ्या न सोडी ॥३॥ निळा म्हणे अवकाश नभ । दोन्ही एकचि ते स्वयंभ ॥४॥