भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमिष देखोनि मीन गुंतलासे गळीं । तैसा काळ बळी पाश घाली

amish dekhoni min guntalase galin | taisa kal bali pash ghali

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आमिष देखोनि मीन गुंतलासे गळीं । तैसा काळ बळी पाश घाली ॥१॥ आप्त गोत्रज असोनि जवळी । नेताती वहिली यमकाळ ॥२॥ दांत विचकूनियां म्हणती गेला गेला । ऐशा अभाग्याला काय बोध ॥३॥ एका जनार्दनीं मनुष्य देहें मूढ । प्रत्यक्ष दगड अवनी भार ॥४॥