भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही वारीक वारीक। करूं हजामत बारीक

amhi varik varik| karun hajamat barik

रचनाकार: संत सेना · अभंग
आम्ही वारीक वारीक। करूं हजामत बारीक ॥ ५॥ विवेक दर्पण आयना दाऊं। वैराग्य चिमटा हालऊं ।॥२॥ उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळूं ॥३॥ भावार्थाच्या बगला झाडूं । काम क्रोध नखें काढू ॥४॥ चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ॥५॥