भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां विधिनिषेधाचें नाहीं पैं कारण । नाम मुखीं स्मरण गोविंदाचें

amhan vidhinishedhachen nahin pain karan | nam mukhin smaran govindachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आम्हां विधिनिषेधाचें नाहीं पैं कारण । नाम मुखीं स्मरण गोविंदाचें ॥१॥ घडेल तें घडो जोडेल तें जोडो । आम्हीं तों न सोडोंक रामकृष्ण ॥२॥ शरीर पतन घडे अनायासें । काय तें सायासें जतनेंचि ॥३॥ एका जनार्दनीं श्रीरामावांचुनीं । दुजा छंद मनीं हा न वाहे ॥४॥