भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां तुमचा भरंवसा । सांभाळावें जगदीशा

amhan tumacha bharanvasa | sambhalaven jagadisha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आम्हां तुमचा भरंवसा । सांभाळावें जगदीशा ॥१॥ आपुली आपण जतन करा । ब्रीदावली हे दातारा ॥२॥ आम्हीं पतितांनी कोडें । तुम्हां घातलें सांकडें ॥३॥ शरण एका जानर्दनीं । मोक्ष मुक्ति तुमचें चरणीं ॥४॥