भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां काळांचें भय तें काय । जनार्दन बापमाय

amhan kalanchen bhay ten kay | janardan bapamay

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आम्हां काळांचें भय तें काय । जनार्दन बापमाय ॥१॥ पाजी प्रेमाचा तो पान्हा । नये मना आन दुजें ॥२॥ दिशाद्रुम भरला पाहीं । जनार्दन सर्वाठायी ॥३॥ एका जनार्दनीं ध्यात । जनार्दन तो ध्यानाआंत ॥४॥