भजनी मालिका
← भजनांकडे परत

आंबिया पाडुं लागला जाण । अंगीं असे आंबटपण

ambiya padun lagala jan | angin ase ambatapan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आंबिया पाडुं लागला जाण । अंगीं असे आंबटपण ॥१॥ सेजे मुराल्याची गोडी । द्वैताविण ते चोखडी ॥२॥ टीकाळले सेजे घालिती । तयांसंगें दुजे नासती ॥३॥ अग्निपोटीं निपजे अन्न । वाफ न जिरतां परमान्न ॥४॥ एका जनार्दनीं गोडी । तोडा लिगाडीची बेडी ॥५॥