भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंबऋषिराया पडिले सायास । सोसी गर्भवास स्वयें देव

ambarushiraya padile sayas | sosi garbhavas svayen dev

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अंबऋषिराया पडिले सायास । सोसी गर्भवास स्वयें देव ॥१॥ उच्छिष्टहीं खातां प्रायश्चित्त असे । गोपाळांचें ग्रास खाय हरी ॥२॥ एका जनार्दनीं भक्तांचा अंकित । म्हणोनी तिष्ठत विटेवरी ॥३॥