भजनी मालिका
← भजनांकडे परत

आलिंगन संतपायां । पावली काया विश्रांती

alingan santapayan | pavali kaya vishranti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आलिंगन संतपायां । पावली काया विश्रांती ॥१॥ सुख अपार झालें । संत पाउलें देखतां ॥२॥ अवघा श्रम फळा आला । काळ गेला देशधडी ॥३॥ एका जनार्दनीं संत । मज भेटोत अखंडित ॥४॥