भजनी मालिका
← भजनांकडे परत

आल्हाददायकश्रीमुख चांगलें । पाहतां मोहिले भक्त सर्व

alhadadayakashrimukh changalen | pahatan mohile bhakta sarva

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आल्हाददायकश्रीमुख चांगलें । पाहतां मोहिले भक्त सर्व ॥१॥ गाई गोपाळ विधिल्या गोपिका । श्रीमुख सुंदर देखा सजिरें तें ॥२॥ आल्हाददायक तें मुखकमळ । वैजयंती माळ हृदयावरी ॥३॥ एका जर्नादनी पाहतां रुपडें । आनंदी आनंद जोडे आपेआप ॥४॥