भजनी मालिका
← भजनांकडे परत

आले आले हरीचे दास । मुखीं रामनाम घोष । तोडोनियां भवपाश । जीवन्मुक्त ते

ale ale hariche das | mukhin ramanam ghosh | todoniyan bhavapash | jivanmukta te

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आले आले हरीचे दास । मुखीं रामनाम घोष । तोडोनियां भवपाश । जीवन्मुक्त ते ॥१॥ वैराग्याचें कवच अंगीं । नाचताती प्रेमरंगीं । ज्ञान शस्त्र तें निसंगीं । छेदिती संग ॥२॥ अनुभव तीक्ष्ण शर । सोडिताती निरंतर । वर्मी खोचले तें वीर । क्रोधादि असुर ॥३॥ सांडोनि देहाभिमान । तोचि जीवन्मुक्त जाण । एका जनार्दना शरण । रामकृष्ण जपताती ॥४॥