भजनी मालिका
← भजनांकडे परत

आला स्वइच्छा पंढरपुरा । सांडूनियां क्षीरसागरा

ala svaichchha pandharapura | sanduniyan kshirasagara

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आला स्वइच्छा पंढरपुरा । सांडूनियां क्षीरसागरा ॥१॥ पुढें देखोनियां इटे । चरण ठेविले गोमटे ॥२॥ दोन्हीं हात कटावरी । ठेवूनि परमात्मा श्रीहरी ॥३॥ निळा म्हणे जगदोध्दार । करीत उभा निरंतर ॥४॥