भजनी मालिका
← भजनांकडे परत

अकार उकार मकार योगीयांची स्थिती । हे प्रकाशज्योति विटेवरी

akar ukar makar yogiyanchi sthiti | he prakashajyoti vitevari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अकार उकार मकार योगीयांची स्थिती । हे प्रकाशज्योति विटेवरी ॥१॥ सबाह्म परिपुर्न भरुनी उरलें । अलक्ष्य तें जाहलें लाक्ष्याकार ॥२॥ सुक्ष्म सरळ दिसतें प्रबळ । एका जनार्दनीं सुढाळ विटेवरी ॥३॥