भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसी कीर्तनाची आवडी । प्रायश्चित्तें जाली देशधडी

aisi kirtanachi avadi | prayashchitten jali deshadhadi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐसी कीर्तनाची आवडी । प्रायश्चित्तें जाली देशधडी ॥१॥ होती तीर्थें तीं बापुडीं । मळ रोकडी टाकिती ॥२॥ ऐकोनी कीर्तनाचा गजर । ठेला यमलोकीचा व्यापार ॥३॥ यमपाश टाकिती खालीं । देखोनि कीर्तनाची चालीं ॥४॥ ऐसा कीर्तनसोहळा । एका जनार्दनीं देखे डोळीं ॥५॥