भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसी जगाची माऊली । दत्तनामें व्यापुनि ठेली

aisi jagachi mauli | dattanamen vyapuni theli

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐसी जगाची माऊली । दत्तनामें व्यापुनि ठेली ॥१॥ जीवें जिकडें तिकडे दत्त । ऐशी जया मति होत ॥२॥ तया सांकडेंचि नाहीं । दत्त उभा सर्वा ठायीं ॥३॥ घात अघात निवारी । भक्तां बाहे धरी करीं ॥४॥ ऐशीं कृपाळु माऊली । एका जनार्दनीं देखिली ॥५॥