भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसी आवडी आहे जीवा । कैं पाहीन केशवा

aisi avadi ahe jiva | kain pahin keshava

रचनाकार: संत सेना · अभंग
ऐसी आवडी आहे जीवा । कैं पाहीन केशवा ॥१॥ माझी पुरवा वासना । सिद्धी न्यावी नारायणा ॥२॥ नलगे वित्त धन। मुखीं नाम नारायण ॥३॥ सेना म्हणें कमळापती। हेंचि द्यावें पुढती पुढती ॥४॥