भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐशिया सुखामाजीं राहेन सुखरुप । दुजा वागों नेदी आड येऊं संकल्प । भोगिन याचोंचि वो सर्वदा पडप । करुनि भावना अखंड तद्रूप वों

aishiya sukhamajin rahen sukharup | duja vagon nedi ad yeun sankalpa | bhogin yachonchi vo sarvada padap | karuni bhavana akhand tadrup von

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ऐशिया सुखामाजीं राहेन सुखरुप । दुजा वागों नेदी आड येऊं संकल्प । भोगिन याचोंचि वो सर्वदा पडप । करुनि भावना अखंड तद्रूप वों ॥१॥ ऐशी ये निश्चयाची सांगितली मात । तुम्हीही आयका हो कृपावंत संत । नकळे माझा मज सत्याचा इत्यर्थ । तुम्हीचि दावाल तो मानीन हितार्थ ॥२॥ येईल चित्तासी ते सांगा विचारुनी । माझे निजहित तेंचि विवरुनी । मी तो नेणोंचि वो याचिये वाहाणी । हेंचि कळासलें हदयभुवनीं वो ॥३॥ हाचि निजानंद आवडला मना । करुं सर्व काळ हेचि विवंचना । रुप दृष्टीपुढें धरुनि गाऊं गुणा । करुनि तदाकार वृत्तीची भावना वो ॥४॥ यावीण नावडे चित्ता ऐसें झालें । दिवसरात्रीं हें ध्यानचि लागलें । सांगती इतरें तें न मानेचि भले । नेणों कोण ऐसें कर्म उभें ठेलें वो ॥५॥ हेंचि राहेन वो धरुनियां दृष्टी । रुप नागर वो मुरली वाजे ओटीं । खांदिये घोंगडें वो घेऊनि वेताटी । चाले गाईमागें सवें गोवळथाटी वो ॥६॥ ऐसिये आवडीचें पुरविलें आर्त । येऊनी एकांतीं वो भेटले गोपिनाथ । तेणें मानस वो माझें झालें स्वस्थ । निळा म्हणे वो भोगिन एकचित्त वो ॥७॥