भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐशी आवडी मीनली सुखा । देव उभा भक्तद्वारीं देखा

aishi avadi minali sukha | dev ubha bhaktadvarin dekha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐशी आवडी मीनली सुखा । देव उभा भक्तद्वारीं देखा ॥१॥ धन्य धन्य पुंडलीका । उभे केलें वैकुंठनायका ॥२॥ युगें अठ्ठावीस नीत । उभा विते कर धारुनियां कट ॥३॥ एका जनार्दनीं शरण जाऊं । काया वाचा मनें त्यासी ध्याऊं ॥४॥